Skip to main content
Shaats Electrical - electrical services in Chh. Sambhajinagar (Aurangabad)
MotorIndustrialMIDCPreventive MaintenanceMarathi

Motor का जळतो? - वाळूज, शेंद्रा MIDC मधील वारंवार होणाऱ्या Motor failures ची कारणे आणि उपाय

वाळूज MIDC, शेंद्रा MIDC आणि चिकलठाणा MIDC मधील लघु कारखान्यांत induction motor वारंवार का जळतो? Single-phasing, voltage imbalance, bearing failure, moisture आणि overload - ८ प्रमुख कारणे आणि engineer-recommended उपाय एका practical guide मध्ये.

Chowdhry Zulfekhar

Founder and Lead Electrical Engineer · BE Electrical, Solapur University

8 min readमराठी
White industrial induction motor on a workshop bench awaiting inspection after a burnout - Shaats Electrical motor diagnostics for Waluj and Shendra MIDC factories

शेंद्रा MIDC मधील एक auto-component unit चा मालक मागच्या महिन्यात फोन वर सांगत होता: "साहेब, हा तिसरा motor आहे या वर्षात जो जळला आहे. प्रत्येकी ₹20,000 चे rewinding, २-३ दिवसांचा downtime, आणि कस्टमर ऑर्डर delay. का होतंय हे?" आम्ही visit ला गेलो, clamp meter लावला, voltage check केला - आणि कारण क्षणात दिसले. Three phases मध्ये एक phase 408V, दुसरा 415V आणि तिसरा 392V. Voltage imbalance जवळपास ५% - induction motor ला हे silent killer आहे.

Motor हे लघु कारखान्याचे heart असते. CNC, lathe, drilling, milling, pump, compressor, exhaust fan, conveyor - सगळ्यात motor आहे. आणि जेव्हा हे जळते, ते एकटे जळत नाही - production line थांबते, deadline हुकते आणि नुकसान दिसण्यापेक्षा कितीतरी पट जास्त असते. ही guide Shaats Electrical च्या engineering team ने ४०+ MIDC site visits च्या निरीक्षणावर आधारित तयार केली आहे.

Motor जळतो म्हणजे नक्की काय होतं?

"Motor जळला" हे एक general phrase आहे. Technically काय fail होतो ते समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण cause आणि prevention दोन्ही वेगळी असतात:

  • Stator winding insulation breakdown: Coil वरचे enamel coating melt होते आणि turn-to-turn किंवा phase-to-phase short circuit होतो. सर्वात common failure (साधारणपणे 70% cases). Rewinding लागते.
  • Bearing failure: Bearing seize होते किंवा खूप हलकी होते. Rotor stator ला घासतो आणि magnetic gap बिघडतो. वेळेवर पकडले तर फक्त bearing replace करून motor वाचतो.
  • Rotor bar broken (squirrel cage): Heavy starting load मुळे rotor bar मध्ये crack येते. Identify करायला कठीण - performance हळूहळू खराब होते.
  • Terminal box arcing: Loose terminal वर current arcing होते आणि शेवटी पूर्ण terminal block जळतो. Visible damage, relatively cheap fix.

८ प्रमुख कारणे - का जळतो हा motor?

१. Single Phasing - सर्वात मोठा कारण

Three-phase motor चालू असताना एक phase खंडित झाला तर उरलेले दोन phases पूर्ण load वर handle करायचा प्रयत्न करतात. Current जवळपास 173% वाढते आणि काही minutes मध्ये winding insulation फटकते. हे सर्वात सामान्य आणि सर्वात preventable कारण आहे.

उपाय:

  • प्रत्येक motor साठी Phase Failure Relay (PFR) अनिवार्य. हे ₹450-₹800 चे device असते - पण ₹20,000 चे rewinding आरामात वाचवते.
  • MSEDCL च्या incoming side ला तीनही phases ची voltage indicator lamp / digital meter असावे - operator ला visual confirmation मिळते.
  • Overload relay चे setting nameplate FLA (Full Load Amps) नुसार calibrate केले असावे.

२. Voltage Imbalance

शेंद्रा MIDC चे जे उदाहरण वर दिले - 5% voltage imbalance म्हणजे winding मध्ये जवळपास 40% current imbalance. Motor आतून जास्त गरम होतो आणि insulation life अर्ध्यावर येते.

उपाय:

  • Three-phase load balanced ठेवा - single-phase load (lighting, office) तीन phases मध्ये distribute करा.
  • Voltage monitor relay बसवा (under-voltage आणि over-voltage दोन्ही cut-off करणारा). Setting साधारणपणे +10% / -10%.
  • NEMA recommendation: voltage imbalance 2% पेक्षा कमी ठेवावा.
  • MSEDCL कडे complaint करा जर supply imbalance आहे - कधी कधी transformer tap setting अडजस्ट करून imbalance कमी होतो.

३. Overload / Continuous Heavy Loading

Nameplate FLA पेक्षा जास्त current सतत draw करत असेल तर winding सावकाश पण निश्चित गरम होतो. आम्ही पाहिले आहे की पुष्कळ workshop मध्ये overload relay चे setting nameplate शी match नसते - कधी "nuisance trip टाळण्यासाठी" higher set केले, कधी default settings च ठेवले.

उपाय:

  • Overload relay = nameplate FLA चा 110-115% (continuous duty motor साठी).
  • Bi-metallic ऐवजी electronic overload relay वापरा - accuracy आणि repeatability खूप जास्त.
  • Motor body च्या temperature चे observation - हाताला 5 sec पेक्षा जास्त ठेवता आला नाही म्हणजे साधारणपणे 70°C+.

४. Frequent Starting / Stop-Start Duty

Press machine, compressor, hoist - हे loads वारंवार start-stop होतात. प्रत्येक starting वर motor 6-7x FLA current draw करतो. ताशी 10 पेक्षा जास्त starts असतील तर thermal stress खूप वाढतो.

उपाय:

  • High inertia load साठी Star-Delta starter किंवा Soft Starter. DOL (direct online) फक्त 5 HP च्या आत मर्यादित ठेवा.
  • Heavy duty applications मध्ये VFD (Variable Frequency Drive) - starting current जवळपास name plate च्या समान ठेवते आणि soft acceleration देते.
  • Motor duty class समजून निवडा - S1 (continuous), S3 (intermittent), S4 (frequent start). Wrong duty class motor 6 महिन्यात च जळतो.

५. Moisture आणि Environmental Damage

पावसाळ्यात MIDC मधील open-shed workshops मध्ये आम्ही पाहतो की roof leak, condensation किंवा washdown water motor च्या आत शिरते. Winding insulation moisture absorb करते आणि insulation resistance पडते.

उपाय:

  • IP55 / IP66 rated motor outdoor किंवा washdown areas साठी.
  • Long shutdown नंतर - विशेषतः पावसाळ्यानंतर - पहिल्यांदा start करण्याआधी insulation resistance (megger) test अनिवार्य. 500V megger reading 100 MΩ पेक्षा जास्त असावी.
  • IR कमी असेल तर motor ला heater लावून किंवा separate space-heater ने dry करा. ओला motor कधीच चालू करू नका.
  • Anti-condensation heater असलेले motors दीर्घकाळ shutdown असणाऱ्या setup साठी.
Large industrial air compressor with its motor inside a small workshop - the kind of high-inertia load that needs proper starter selection to avoid motor burnout
Compressor / pump सारखे high-inertia loads - DOL ऐवजी star-delta किंवा soft starter वापरून motor stress कमी होतो.

६. Bearing Wear आणि Vibration

Bearing fail होते म्हणजे rotor stator घासतो आणि magnetic gap बिघडतो. यानंतर motor काही दिवसच चालतो - मग winding short करते. Bearing failure हे actually winding burnout चे सर्वात unseen precursor आहे.

उपाय:

  • Bearing greasing schedule manufacturer नुसार - overgreasing सुद्धा harmful आहे.
  • Vibration दर 3 महिन्याला हाताने तपासा - abnormal hum, growling sound, lateral vibration म्हणजे bearing निकट fail.
  • Pulley alignment, belt tension - चुकीचे alignment bearing life थेट निम्म्यावर आणते.
  • Critical motors साठी vibration analyzer ने quarterly readings ठेवा.

७. Harmonics from VFD आणि Welding Sets

लघु कारखान्यांमध्ये VFD, MIG welder, induction heater - हे harmonic-rich loads आहेत. हे harmonics non-VFD motors च्या winding मध्ये extra heat तयार करतात आणि insulation life कमी करतात. हे कारण फार कमी electricians ओळखतात.

उपाय:

  • VFD output ला dV/dt filter किंवा output reactor लावा - विशेषतः 50 m पेक्षा जास्त cable असेल तर.
  • Power quality audit मध्ये THD (Total Harmonic Distortion) measure करा - current THD 8% च्या वर असेल तर harmonic filter ची गरज.
  • Capacitor bank वर detuned reactor - नाहीतर capacitor blast आणि motor heat दोन्ही.

८. Wrong Cable Sizing आणि Loose Terminations

Motor पासून starter / panel पर्यंत cable size लहान असेल तर voltage drop जास्त होतो, motor full voltage पर्यंत पोहोचत नाही आणि current जास्त draw करतो. आणि loose terminal वर continuous arcing - terminal block जळवून शेवटी motor पर्यंत damage.

उपाय:

  • Cable size voltage drop calculation नुसार - साधारणपणे रन length आणि FLA वर depend. एक 7.5 HP motor 50m run साठी minimum 4 sq mm copper.
  • सर्व terminal connections lugs ने crimp करा - bare wire wrap टाळा.
  • वर्षातून दोनदा terminal tightening (torque wrench ने, manufacturer spec नुसार).
  • Thermal imaging ने hot spots ओळखणे - हा preventive maintenance चा सर्वात powerful tool आहे.

Warning Signs - हे दिसले तर लगेच action घ्या

Motor कधीच अचानक नाहीच जळत - आधी हे signals देतो. आपल्या operators ना हे train करा:

  • Motor मधून uneven humming किंवा growl - bearing किंवा rotor समस्या.
  • Body unusually hot - touch करता येत नसेल (60°C+).
  • जळल्याचा वास - instant shutdown, खूप likely insulation breakdown सुरू आहे.
  • Current draw दिवसेंदिवस वाढतोय - clamp meter ने weekly check.
  • Excessive vibration - bearing imminent failure.
  • Phase voltage display एक phase कमी दाखवतोय - single phasing सुरू आहे, lights पेटवू नका.
  • Frequent overload trip - actual fault आहे, override करू नका.
Technician inspecting an electrical tool / motor end on a wooden bench - typical motor diagnostic moment during a Shaats Electrical workshop visit
Motor inspection - terminal box, body temperature, IR test आणि bearing condition - चार पायऱ्या प्रत्येक quarterly visit मध्ये.

Rewinding करावे की नवीन motor?

एक जळलेला motor समोर असेल, तर rewinding की replacement - हा प्रश्न प्रत्येक मालकाला पडतो. आमचा एक practical rule:

  • Motor नवीन आहे (3 वर्षांच्या आत) - rewinding worth आहे.
  • Motor 5-10 वर्ष जुना आहे - pre-rewind efficiency test करून घ्या. Drop 5% च्या आत असेल तर rewind, जास्त असेल तर new IE3 motor विचारात घ्या.
  • Motor 10+ वर्ष जुना - Energy-efficient नवीन IE3 motor ची ROI साधारणपणे 2-3 वर्षात भरून निघते (पॉवर बचतीतून).
  • Critical production motor असेल तर standby spare ठेवा - production loss ची किंमत motor च्या किंमतीपेक्षा जास्त असते.
  • Rewinding कोणाकडून करायचे - हे महत्त्वाचे. Class-F insulation, vacuum varnish, proper torque, balancing - हे सर्व cheap shop मध्ये होत नाही. Quality matters.

Preventive Schedule - एका page वर

  • दर महिन्याला: Current draw measurement (clamp meter), motor body temperature, terminal box visual.
  • दर तिमाहीला: Vibration check, bearing greasing (schedule नुसार), thermal scan, overload relay test.
  • दर सहा महिन्यांनी: Insulation resistance (megger) test, terminal tightening, alignment check, voltage / current imbalance reading.
  • दर वर्षी: Pre-monsoon IR test, bearing condition assessment, harmonic / power quality audit, comprehensive motor report.

FAQ - Motor Failure बद्दलचे प्रश्न

Q. Motor जळला म्हणजे आमच्या supply मध्ये problem आहे का?

अनेकदा हो. एका single motor च्या burnout चे कारण सहसा motor मध्ये नसते - supply, starter, cable किंवा load profile मध्ये असते. म्हणूनच आम्ही एक motor burn झाला की root cause analysis insist करतो - नाहीतर तेच कारण उरलेल्या motors ना सुद्धा गिळून टाकेल.

Q. Rewinding नंतर motor ची warranty किती?

Quality rewinder साधारणपणे 6-12 महिन्यांची warranty देतो - पण ती winding वर असते, bearing किंवा external cause वर नाही. आम्ही rewinding सोबत root cause report देतो, ज्यामुळे warranty claim सुलभ होतो.

Q. IE3 motor आणि standard motor मध्ये फरक काय?

Efficiency rating - IE3 साधारणपणे 4-6% जास्त efficient. एक 10 HP motor साठी वर्षाला साधारणपणे ₹8,000-₹15,000 ची power बचत (8 hours/day usage साठी). 2-3 वर्षात extra cost भरून निघतो.

Q. Motor माझ्या supply ने जळला हे कसे prove करायचे?

Power quality logger 24-48 तास supply वर लावून voltage, current, harmonic आणि sag/swell record करता येते. हा report MSEDCL कडे complaint साठी सुद्धा वापरता येतो.

Q. Spare motor ठेवायचा का?

Critical production motor (compressor, primary press, main pump) साठी हो. Spare नसेल तर rewinding ची 2-3 दिवसांची production loss सहसा spare motor च्या cost पेक्षा जास्त असते.

Shaats Electrical सोबत Motor Health Audit

वाळूज MIDC, शेंद्रा MIDC, चिकलठाणा MIDC, रेल्वे station MIDC किंवा छ. संभाजीनगर (औरंगाबाद) मधील कुठल्याही industrial setup मध्ये असाल - एक initial motor health audit साठी आम्हाला फोन / WhatsApp करा. आमचा scope:

  • प्रत्येक motor चे voltage, current, IR, temperature, vibration - baseline readings.
  • Starter, overload relay, PFR / phase monitor - settings audit.
  • Cable sizing, terminal tightening, earthing - physical check.
  • एक written report - कोणत्या motors ला immediate attention हवी, कोणत्यांना preventive action, कोणत्यांची replacement.
  • AMC अंतर्गत quarterly / monthly motor inspection visits.

एक जळलेला motor म्हणजे फक्त rewinding cost नाही - production loss, customer commitment, employee idle time, आणि चिंता. एका good preventive program ने हे ८०% प्रसंग टाळता येतात.

हे देखील वाचा: पॅनेल बोर्ड देखभाल मार्गदर्शक आणि power factor / capacitor bank guide. वाळूज MIDC आणि चिकलठाणा MIDC मध्ये motor health audit उपलब्ध आहे.

Talk to an engineer

Need preventive maintenance or an AMC quote?

Shaats Electrical's engineer-led team serves Chh. Sambhajinagar (Aurangabad), Waluj, Chikalthana, Shendra and surrounding areas. Call or WhatsApp - we will plan a visit and a maintenance schedule that fits your premises.

Keep reading

Related guides

Chat on WhatsApp
Call +91 89832 37729 for electrical service in Chh. Sambhajinagar (Aurangabad).